'तथास्तु' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

  Pali Hill
  'तथास्तु' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  मुंबई  -  

  मुंबई - झी टॉकीज निर्मित तथास्तु हा थ्रिलर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तथास्तु हा मराठीतला पहिला सायलेंट थ्रिलर चित्रपट आहे. एकही संवाद नसलेल्या या चित्रपटाची सशक्त कथा-संकल्पना, कलाकारांचा परफॉर्मन्स आणि दिग्दर्शन ही जमेची बाजू आहे. संदीप पाठक, माधवी निमकर अशी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तथास्तु चित्रपटाच्या निमित्तानं एक वेगळा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीत केला जातोय. शनिवार ३ डिसेंबर रोजी रात्री १०.०० वाजता आणि रविवारी ४ डिसेंबरला रात्री १०.०० वा. तथास्तु सिनेमाचा थरार झी टॅाकीजवर अनुभवता येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.