SHARE

लेखक संजय पवार यांचा मुस्लीम विवाह संस्थेवर भाष्य करणाऱ्या 'हलाल' सिनेमाचा टीजर लॉन्च करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, समाजसेवक डॉ. बाबा आढाव, तसेच मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी या मान्यवरांच्या उपस्थिती होती. या चित्रपटात ‘तलाक’चा शस्त्रासारखा वापर करून मुस्लीम स्त्रियांच्या केल्या जाणाऱ्या भावनिक खच्चीकरणावर भाष्य करण्यात आले आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे, विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या 'हलाल'मध्ये भूमिका आहेत. 'हलाल' चित्रपटाची निर्मिती अमोल कागणे यांनी केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. लेखक राजन खान यांच्या 'हलाला' कथेवर आधारित 'हलाल' हा सिनेमा येत्या २९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

संबंधित विषय
ताज्या बातम्या