• 8 व्या आंतरभारती साहित्य संवादाला सुरुवात
  • 8 व्या आंतरभारती साहित्य संवादाला सुरुवात
SHARE

माटुंगा- 2002 पासून प्रत्येकी 2 वर्षांनी एकदा घेण्यात येणाऱ्या सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या 8 व्या आंतर भारती साहित्य संवादाला शुक्रवारी माटुंग्यातल्या म्हैसूर असोशिएशन हॉल येथे सुरुवात झाली. साहित्य संवादाची प्रस्तावना कवयित्री नीरजा यांनी करत कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी उत्कृष्ट अनुवादक उमा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. कन्नड मधून मराठीत 51 पुस्तके त्यांनी अनुवादित केले आहेत. कन्नड साहित्य मराठीत आणणारी विशेष व्यक्ती आजपर्यंत अनेक लेखकांचे साहित्य मराठी वाचकांसाठी त्यांनी मराठीत आणले. अनेक पुरस्काराच्या मानकरी असलेल्या उमा कुलकर्णी यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सी. एन. रामचंद्रन यांच्या हस्ते हा पुरस्कार उमा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला.

या साहित्य संवादाचा मुख्य विषय अस्वस्थ जगत असा ठेवण्यात आला असल्यामुळे यावेळी विषयाला सुरुवात करताना या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अस्वस्थ जगत या विषयावर भाष्य केले. यावेळी केतकर म्हणाले, काळानुरूप माध्यमांमध्ये बदल होत आहेत. संपूर्ण जगात कशा प्रकारची अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेचे स्वरूप काय आहे. बदलत्या जगाच्या विविध सुख सोईंसाठी वापरण्यात येणाऱ्या गोष्टींचा निसर्गावर होणार परिणाम, निसर्गात होणारे बदल आणि त्याचे धोके यावर दाखले देत त्यांनी भाष्य केले. म्हैसूर असोसिएशनच्या वतीने के.कमला यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या या 2 दिवसीय साहित्य संवादात अनेक ज्येष्ठ कवी लेखक साहित्यिक आपले विचार मांडणार आहेत. साहित्य संवादाच्या पहिल्याच दिवशी कन्नड आणि मराठी साहित्याच्या दृष्टीने मराठी कन्नड साहित्यिकांनी अस्वस्थ जगत हा विषय डोळ्यासमोर ठेवत भाष्य केले.

यावेळी डॉ. रामचंद्रन, कवयित्री नीरजा, ज्येष्ठ साहित्यिक पूष्पा भावे यांच्यासह अनेक मराठी आणि कन्नड साहित्यिक यांनी उपस्थिती दर्शवत साहित्य संवादाची दमदार सुरुवात केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या