Advertisement

बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारा नवीन सदस्य कोण?


बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणारा नवीन सदस्य कोण?
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रेक्षकांना तसेच घरामधील सदस्यांना एकानंतर एक सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकर यांनी गुरुवारी बिग बॉस मराठीचं घर सोडलं. आणि या घरामध्ये “SR” म्हणजे कोण? याचं कोडे उलगडलं.


घरात शर्मिष्ठाचं स्वागत

बिग बॉस यांनी शर्मिष्ठाच्या घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी त्यागराज खाडिलकर सज्ज आहेत. शर्मिष्ठा राऊतनंतर आता त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर काय घडेल? हे बघणे रंजक असणार आहे.


त्यागराज खाडिलकर यांची कारकिर्द

त्यागराज खाडिलकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात “स्मरणयात्रा” नावाच्या मराठी चित्रपट संगीताने झाली. त्यागराज यांना अखिल भारतीय मराठी विद्यार्थी परिषदेचा “गानहिरा” हा पुरस्कार मिळाला आहे. ते संस्कृती कलादर्पण, महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराचेदेखील मानकरी आहेत. त्यागराज यांनी ५२ हून अधिक मालिकांचं शीर्षक गीत गायलं असून, अनेक सिनेमांचं संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वगायन केलं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळत आहे, हे माझं भाग्यच आहे. या घरामध्ये जाण्याचं आमंत्रण किंवा संधी सगळ्यांना मिळत नाही. त्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान आहे. माझं इतक्या वर्षांचं या क्षेत्रामधील योगदान असेल की, मला या घरामध्ये जाण्याची संधी मिळत आहे. मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे.

- त्यागराज खाडिलकर, गायक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा