Advertisement

धमाल ‘आप्पा आणि बाप्पा’ची


SHARES

असंख्य आस्तिकांचं आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. भक्तांच्या हाकेला धावून येणारं दैवत अशी ख्याती असलेला हा बाप्पा कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांची मदत करत असतो. केवळ त्याला ओळखण्याची गरज असते. याच बाप्पाभोवती फिरणारी कथा आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

या चित्रपटाचा गमतीशीर आणि तितकाच उत्साहवर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात अभिनय केलेल्या भरत जाधव, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, उमेश जगताप आदि कलाकारांसोबतच प्रथमच मराठी सिनेमाला संगीत देणाऱ्या अभंग रिपोस्ट या बँडनं ‘मुंबई लाईव्ह’सोबत एक्सक्लुझीव्ह बातचित केली. 

गरिमा प्रोडक्शन्स् ची प्रस्तुती असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा पहिलाच मराठी चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement