Advertisement

अली अब्बाज जफरच्या घरावर पोलिसांनी चिटकवली नोटीस

घराबाहेर एक नोटीस चिकटवली असून एका आठवड्यात लखनौमध्ये चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं आहे.

अली अब्बाज जफरच्या घरावर पोलिसांनी चिटकवली नोटीस
SHARES

सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या 'तांडव' या वेब सीरिजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याविरोधात लखनऊत गुन्हा दाखल झाला. यासाठी युपी पोलिसांचे विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे.

युपी पोलिसांची टीम गुरुवारी अली यांच्या घरी पोहोचली तेव्हा तेथे त्यांची भेट झाली नाही. तपास अधिकारी अनिल कुमार सिंग यांनी त्यांच्या घराबाहेर एक नोटीस चिकटवली असून एका आठवड्यात लखनौमध्ये चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं आहे.

अनिल यांनी सांगितल्यानुसार, अली यांना २७ जानेवारी रोजी लखनौत चौकशीसाठी अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यासाठी सांगण्यात आलं आहे. घर बंद होतं आणि कोणीही त्यांच्या घरी हजर नव्हतं, म्हणून नोटीस त्यांच्या घरी चिकटवण्यात आली, असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं वेब सीरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अ‍ॅमेझॉनच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. एफआयआरमधील आरोपींना पुढील तीन आठवड्यांसाठी वेळ मिळाला आहे.

मुंबईतही एफआयआर दाखल तांडव वादानंतर निर्मात्यांनी माफी मागितली असून मालिकेतील वादग्रस्त सीन हटवण्यात आला आहे. परंतु तक्रारी मागे घेण्यात आलेल्या नाहीत. आमदार राम कदम यांच्या मागणीवरुन मुंबई पोलिसांनी एक दिवस आधीच आयपीसी कलम 153 (A), 295(A) आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा