Advertisement

१ सप्टेंबरला अस्सल गावरान शिव्या ऐकायला तयार रहा!


१ सप्टेंबरला अस्सल गावरान शिव्या ऐकायला तयार रहा!
SHARES

"काय गं डंगरे, कशाला नाचतीस?....तुझ्या आईच्या वरातीत नाचती"; अशी तुफान डायलॉगबाजी आणि बेसुमार शिव्यांच्या धडाका असलेला 'बंदूक्या' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र बॊरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केलं आहे.

समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रुढी, परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बंदूक्या' सिनेमाने ६ नामांकनं आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या सिनेमाची उंची नक्कीच उंचावली आहे. 



अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकुटे, निलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाण, उन्नती शिखरे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची भाषाच निखळ मनोरंजन करणारी असल्याने प्रेक्षकांना याचा अनुभव नक्की घ्यायला आवडेल. अस्सल गावरान शिव्या या विशिष्ट बोली भाषेचा एक अविभाज्य आणि संरक्षक घटक असल्याने 'बंदूक्या' हा वेगळ्या धाटणीचा तसेच मनोरंजनाच्या नेहमीच्या चौकटीबाहेरचा सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल यात शंका नाही. 'बंदूक्या' हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा