Advertisement

'निर्भया' ६ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित


'निर्भया' ६ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित
SHARES

प्रेक्षकांच्या जाणिवा व समाजभान जागृत करणाऱ्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. महिलांचा लैंगिक छळ हा आजच्या काळातला ऐरणीवरचा विषय आहे. घराबाहेर पडलेल्या स्त्रीची घुसमट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आगामी 'निर्भया' या मराठी चित्रपटातून झाला आहे. 'निर्भया' हा सिनेमा येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती अमोल अहिरराव यांची असून दिग्दर्शन आनंद बच्छाव (साई आनंद) यांचं आहे.



निर्भयाच्या आयुष्यात घडणाऱ्या एका दुर्देवी घटनेमुळे तिचं आयुष्य उध्वस्त होतं. या दुर्देवी घटनेनंतर पोलिस, तसेच राजकीय नेत्यांकडून दाद मागायला गेलेल्या निर्भयाच्या पदरी निराशा पडते. निर्भयाच्या आयुष्यात पुढे अशा काही घटना घडतात की, तिच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं. या वळणामुळे निर्भयाच्या आयुष्याला कलाटणी मिळते का? या गोष्टीवर आधारित 'निर्भया' हा सिनेमा आहे.

या चित्रपटात योगिता दांडेकर निर्भयाच्या मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत स्मिता जयकर, किशोर महाबोले, अनिकेत केळकर, अभिजीत कुलकर्णी, ओंकार कर्वे, ज्ञानेश्वर वाघ, पूजा राज, प्रवीण दवे, विद्या भाटिया यांच्या भूमिका आहेत.



चित्रपटात वेगवेगळी चार गाणी असून ती आदर्श शिंदे, महमद अजीज, रुतु पाठक, उत्तरा केळकर, शाहीद मालिया, सोनू मालिया, कविता निकम यांनी गायली आहेत. 6 ऑक्टोबरला 'निर्भया' प्रदर्शित होत आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा