Advertisement

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन


ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन
SHARES

मराठी रंगभूमीची बंडखोर अभिनेत्री अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या लालन सारंग यांचं शुक्रवारी निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. नाटकांव्यतिरिक्त 'सामना, हा खेळ सावल्यांचा, महेक यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.  


'या' नाटकांत केलं काम

स्टील फ्रेम, अशा या दोघी, सखाराम बाईंडर, रथचक्र, कमला या नाटकांतमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका खास होत्या. नाटक आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच त्यांनी 'नाटकामागील नाट्य' हे पुस्तकही लिहिलं होतं. लालन सारंग यांचा ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता.


कलाविश्वातील योगदान

  • आक्रोश (वनिता)
  • आरोप (मोहिनी)
  • उद्याचा संसार
  • उंबरठ्यावर माप ठेविले
  • कमला (सरिता)
  • कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
  • खोल खोल पाणी (चंद्राक्का)
  • गिधाडे (माणिक)
  • घरकुल
  • घरटे अमुचे छान (विमल)
  • चमकला ध्रुवाचा तारा
  • जंगली कबुतर (गुल)
  • जोडीदार (शरयू)
  • तो मी नव्हेच
  • धंदेवाईक (चंदा)
  • बिबी करी सलाम
  • बेबी (अचला)
  • मी मंत्री झालो
  • रथचक्र (ती)
  • राणीचा बाग
  • लग्नाची बेडी
  • सखाराम बाइंडर (चंपा)
  • संभूसांच्या चाळीत
  • सहज जिंकी मना (मुक्ता)
  • सूर्यास्त (जनाई)
  • स्टील फ्रेम (हिंदी)

पुरस्कार आणि सन्मानसंपादन

  • लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार मिळाला आहे.
  • पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
  • इ.स. २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)
  • कमलाकर सारंग व त्याची जोडी या वेगऴ्या प्रकारच्या नाट्यनिर्मितीसाठी प्रख्यात.
  • दिग्दर्शक महेश सातोस्करच्या 'निवडुंग ' ( १९८९) या चित्रपटात काम
  • जब्बार पटेलच्या सिंहासन ( १९७९ )
  • निर्माता दिग्दर्शक राकेश सारंग हा त्यांचा मुलगा आहे.
  • लालन सारंग उत्तम स्वयंपाक करायच्या,तोच गुण राकेश ह्याच्याकडे ही आहे ते ही छान स्वयंपाक करतात.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा