‘आज नाटक बघा नि उद्या पैसे द्या’

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाट्य क्षेत्रही ढवळून निघाले. चलन तुटवड्यामुळे रसिकांनी मराठी नाटकांकडे पाठ फिरवली. त्याचा फटका सुनील बर्वे यांची निर्मिती असलेल्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकालाही बसला. परंतु, देशहिताच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत करीत बर्वे यांनी मराठी रसिकांना नाट्यगृहात येण्यासाठी ‘आज नाटक बघा नि उद्या पैसे द्या’, या योजनेची घोषणा केली. तसेच मराठी रसिकांना नाटक बघता यावे यासाठी रोख रकमेव्यतिरिक्त आणखी इतर पर्यायही उपलब्ध करून दिले. त्याबद्दल ‘मुंबई लाइव्ह’च्या ‘चाय चॅट’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होत बर्वे यांनी या कल्पक उपक्रमाबद्दल भाष्य केले.

 

Loading Comments