Advertisement

बिग बॉसच्या घरामधील कलाकारांचा आजचा दिवस!


बिग बॉसच्या घरामधील कलाकारांचा आजचा दिवस!
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क रंगला होता. या टास्कमध्ये मेघा हिने बाजी मारून ती आस्ताद काळेनंतर कॅप्टनपदी विराजमान झाली आहे. मेघा धाडे हिने सई आणि रेशमला मागे टाकत हे पद जिंकलं आहे.

या टास्कनुसार मेघा, रेशम आणि सई या तिघींना कॅप्टन्सीची विंग हातामध्ये धरून ठेवणे अपेक्षित होतं आणि जो हा विंग शेवटपर्यंत पकडून ठेवेल तो स्पर्धक या टास्कचा विजेता ठरणार होता. रेशमने विंग सर्वप्रथम सोडून दिल्याने ती या टास्कमधून बाहेर पडली. सई आणि मेघामध्ये हा टास्क सकाळपर्यंत चालला. शेवटी मेघा धाडे ही या टास्कची विजेती ठरली. त्यामुळे या आठवड्यात मेघाची कॅप्टन बनण्याची इच्छा पूर्ण झाली, असं म्हणायला हरकर नाही.

जुई आणि सई या दोघांमधील वाद काही थांबताना दिसत नाही. रेशम आणि जुईने सकाळी सकाळीच सईवर निशाणा साधत, ती किचनमध्ये कशी चुका करते हे तिला सांगण्यास सुरुवात करणार आहे. पण वारंवार घरातील काही सदस्यांच्या अशा बोलण्याने खूप वाईट वाटत असल्याचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये टोकलेलं कुणालाच आवडत नाही, असं सई अनिल थत्ते यांच्याकडे बोलून दाखवणार आहे.

बिग बॉस शुक्रवारी एक नवा टास्क घोषित करणार आहे. या टास्कचं नाव आहे 'थत्तेगिरी'. या टास्कनुसार अनिल थत्ते 'थत्तेगिरी' या टॉक शोमध्ये स्पर्धकांना प्रश्न विचारणार असून यामध्ये स्पर्धकांना आपला दृष्टीकोन मांडायचा आहे. अनिल थत्ते यांची पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरी आणि अनुभव लक्षात घेता बिग बॉस यांनी अनिल थत्ते यांना हे कार्य सोपावलं आहे. अनिल थत्ते यांनी हा टॉक शो मनोरंजनात्मकरीत्या खेळायचा आहे. या टास्कमध्ये या आठवड्यातील काही चर्चेत असलेले स्पर्धक सहभागी होणार आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा