Advertisement

बिग बॉसच्या घरात आज काय घडणार?


बिग बॉसच्या घरात आज काय घडणार?
SHARES

घर म्हंटलं की, भांडण होणारच, कधी मतं जुळणार तर कधी मतभेदही होणार. बिग बॉसच्या घरातही हेच दृष्य पाहायला मिळतं. पण आज बिग बॉसच्या घरात आठवड्याचा पहिला दिवस तसा शांततेत सुरू होणार आहे. रेशम आणि सईमध्ये सगळं काही ठीक होणार आहे.


काय असेल टास्क?

एक से भले दो असं म्हंटल जातं. त्यामुळेच जगात जोडीचं अनन्य साधारण महत्त्व आहे. बिग बॉसच्या घरामध्ये लाडी-गोडीने तर कधी चकमकींमुळे निरनिराळ्या जोड्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यामुळेच बिग बॉस आज घरातील सदस्यांना 'तुझी माझी जोडी' हे कार्य देणार आहेत. ज्या कार्याच्या अंतर्गत नव्या जोड्यांचं ज्वलंत समीकरण कसं जुळतं हे बघण्यासारखं ठरेल यात वाद नाही.

त्याचप्रमाणे विनीतला एलिमिनेशननंतर एक विशेष अधिकार मिळाला आहे. ज्यानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्याच्या घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करू शकतो आणि विनीतने अनिल थत्ते यांना नॉमिनेट केलं आहे. आता येत्या आठवड्यामध्ये अनिल थत्तेंबरोबर कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचं मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणे रंजक असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा