कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांचा वाढदिवस साजरा करण्याचं हटके कार्य रंगलं. रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना ‘तिकीट टू फिनाले’ मिळणार असं घोषित केलं. ज्याला हे तिकीट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे. काल मेघा ‘तिकीट टू फिनाले’मधून बाद झाली. आज या रेसमधून आणखी कोण बाद होणार? हे पाहायला मिळेल.
बिग बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात? याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखवण्यात येणार आहे. हे बघितल्यानंतर घरातील सदस्य मेघाच्या विरोधात गेले आणि सगळ्यांनीच तिला जाब विचारायला सुरुवात केली.
रेशमने मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की, ती जे काही पर्सनल तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसंच सईनं शर्मिष्ठाला आणि आस्तादने मेघाला जाब विचारला. पुष्कर आणि सईसह बरेच जण मेघावर नाराज झालेले दिसले. मेघा जे काही पुष्करबद्दल बोलली त्यावरून पुष्कर आणि सईनेही मेघाचं नाव ‘तिकीट टू फिनाले’मधून बाद होण्यासाठी घेतलं.
बिग बॉसमध्ये सदस्यांच्या प्रवासामध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज-गैरसमजांची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळवण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर बॉक्स-अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे? हे पाहाणं रंजक असणार आहे.
यामध्ये मेघा, आस्ताद आणि रेशम यांना मिळून बॉक्समध्ये असलेले शर्मिष्ठा, पुष्कर, स्मिता आणि सई यांना त्या बॉक्समधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तसंच काल झालेल्या वादावरून शर्मिष्ठा आणि मेघामध्ये आज बरीच चर्चा होणार आहे. ती काय आहे हेही आज बघायला मिळेल. यासोबतच आज बिग बॅासच्या घराला कोणते पाहुणे भेट देतील यावरूनही पडदा उठेल.