सर्वोत्तम अभिनेत्री कोण?

 Masjid Bandar
सर्वोत्तम अभिनेत्री कोण?

आयएनटीत सर्वोत्तम अभिनेत्री ठरणे म्हणजे टीव्हीवरील मालिकेत प्रवेश हे गेल्या काही वर्षापासून समीकरणच बनले आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब जिंकणाऱ्या मुलीला झी किंवा कलर्सवरील मालिकांमध्ये नक्कीच संधी मिळत आहे. 2 वर्षांपूर्वी सर्वोत्तम अभिनेत्री ठरलेली सिद्धी कारखानीस हिला अभिनयाची संधी मिळाली होती. आता ती 'झी' चा भाग होऊन 'लव्ह लग्न लोचा' या मालिकेत काम करत आहे. त्याचप्रमाने रेशम श्रीवर्धनकर हिला देखील मागील वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक देण्यात आले होते. पुढे ती देखील 'पसंत आहे मुलगी' मधून नावारूपाला आली. त्यामुळे यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब कोणाला मिळणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Loading Comments