Advertisement

सलमानमुळे 'या' नव्या अभिनेत्रीला मिळाला ब्रेक!


सलमानमुळे 'या' नव्या अभिनेत्रीला मिळाला ब्रेक!
SHARES

गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवुडमधला एक मोठा ब्रँड ठरलेला अभिनेता सलमान खान अनेक नवोदित कलाकारांसाठी बॉलिवुडची चावी ठरला आहे. कतरिना कैफ, जरीन खान, स्नेहा उलाल, डेजी शाह, अथिया शेट्टी, सूरज पांचोली अशी अनेक नावं या यादीमध्ये आहेत. पण आता त्या यादीमध्ये आणखी एक नाव समाविष्ट होणार आहे. आणि ते नाव आहे योगिता बिहानी हिचं!



दिल ही तो है...

'१० का दम' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये योगिता बिहानी दिसली होती. आता योगिता बिहानी एकता कपूरच्या नव्या सीरिअलमध्ये दिसणार आहे. 'दिल ही तो है' असं या सिरीअलचं नाव आहे. स्वत: योगितानेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


एक्साईटेडपण आणि नर्व्हसपण!

यासंदर्भात बोलताना योगिता म्हणाली, "नवोदित कलाकारांसाठी एकता कपूरच्या सिरीअलमध्ये काम मिळणं ही खूप मोठी बाब आहे. मी या प्रोजेक्टसाठी खूप एक्साईटेडपण आहे आणि नर्व्हसपण आहे!"



पलक शर्माची तीक्ष्ण भूमिका

या सीरीअलमध्ये योगिता पलक शर्मा नावाच्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. पलक एक आनंदी मुलगी आहे. त्याचसोबत ती तिच्या विचारांवर ठाम राहणारी आहे. ही सीरीअल सोनी टीव्हीवर प्रसारित केली जाणार आहे. सोनी टीव्हीच्याच टीमने या सीरीअलसाठी योगिताचं नाव सुचवलं होतं.



हेही वाचा

बिग बॉसच्या घरात गुप्तहेर 'खुनी'ला ओळखणार का?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा