Advertisement

असा रंगला झी मराठी अवॉर्ड्स नामांकन सोहळा...


असा रंगला झी मराठी अवॉर्ड्स नामांकन सोहळा...
SHARES

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे 'झी मराठी अवॉर्ड्स'! या सोहळ्याला सगळ्याच प्रेक्षकांचा आवडीचा सोहळा असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण, झी मराठीवर सुरु असलेल्या मालिका या सर्वांच्याच आवडीच्या मालिका असतात. आणि आवडता कलाकार आणि मालिकेचे पुरस्कार कोणाला मिळतात? ही उत्सुकता सर्वांनाच असते. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा पार पडतो.



कलाकारांचे परफॉर्मन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.



या मुख्य सोहळ्याइतकाच रंगतदार असतो, तो नामांकनाचा सोहळा. एका विशिष्ट संकल्पनेवर (थीमवर) हा आधारित असतो. यावर्षी ‘ब्युटी अॅंड बिस्ट’ (Beauty and Beast) अशी थिम होती. अनेक कलाकारांनी त्या थीमला साजेसा पेहरावसुद्धा केला होता. झी मराठीवरील सर्व मालिकेतील कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.



या अवॉर्ड्ससाठी प्रेक्षकांकडून मतं मागवण्यात येतात. यंदाही ही प्रक्रिया सुरु झाली असून प्रेक्षक मिस्ड् कॉलद्वारे, झी मराठीच्या अधिकृत फेसबुक पेज आणि झी मराठीच्या वेबसाईटद्वारे www.zeemarathi.com  हे मतदान करु शकतात.



महत्त्वाच्या पाच विभागांसाठी पुढील क्रमांकावर मिस्ड् कॉल देऊन मतदान करता येऊ शकणार आहे. मतदानाची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१७ ही आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा