Advertisement

रविवारी ठरणार कोण आहे महाराष्ट्राची 'संक्रांत क्विन'!


रविवारी ठरणार कोण आहे महाराष्ट्राची 'संक्रांत क्विन'!
SHARES

नात्यातील कटूता विसरुन त्यात माधुर्य पेरण्याची संधी देणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत! नात्यातील गोडवा जपण्याचा संदेश देणाऱ्या या सणाच्या निमित्ताने झी मराठी वाहिनी नवीन उपक्रम खास महिला वर्गासाठी घेऊन आली आहे. होम मिनिस्टरच्या धर्तीवर झी मराठीने 'संक्रांत क्विन' हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आणला आहे.

रोजच्या कंटाळवाण्या रूटीनमधून महिलांना विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना हक्काचं व्यासपीठ मिळावं हा मुख्य उद्देश यामागे आहे. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा हा उपक्रम महाराष्ट्राच्या सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, धमाल खेळ आणि भरपूर मनोरंजक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.


इथे होणार स्पर्धा

येत्या रविवारी २१ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता फडके रोड, अप्पा दातार चौक, गणेश मंदिर, डोंबिवली पूर्व इथे 'संक्रांत क्विन' पार पडणार आहे.


या कलाकरांच्या उपस्थितीत रंगणार स्पर्धा

'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली केतकी चितळे, तर 'स्वराज्य रक्षक संभाजी' या झी मराठीवरील मालिकेतील पल्लवी वैद्य आणि स्नेहलता वसईकर या लाडक्या कलाकारांच्या उपस्थितीत ही स्पर्धा डोंबिवलीत रंगणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा