Advertisement

बीकेसीत आढळले १० आणि १५ फूट लांबीचे अजगर


बीकेसीत आढळले १० आणि १५ फूट लांबीचे अजगर
SHARES

वांद्र्यातील बीकेसीत रस्त्यावर तब्बल ११ फूट लांबीचा अजगर आढळल्याची घटना ताजी असताना सोमवारी रात्री याच परिसरात आणखी दोन अजगर आढळले. सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास बीकेसीतील इन्कम टॅक्स ऑफिस आणि टाटा कॉलनी परिसरात १० आणि १५ फूट लांबीचे दोन अजगर आढळले.
एका दक्ष नागरिकानं पोलिस कंट्रोल रूमला संपर्क करून याबाबत माहिती दिल्यानंतर त्या अजरगांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामधील एक अजगराला रेस्क्यू करण्यात यश आलं. तर दुसरा अजगर जंगलात निघून गेला.

WhatsApp Image 2018-10-09 at 12.31.25 PM.jpeg 

सोमवारी मध्यरात्री सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी पायी जात असताना 'सुयेश यादव' या नागरिकाला बीकेसी परिसरात दोन अजगर आढळले. अजगरला पाहताचं त्याने पोलिस कंट्रोल रूमला कळवलं. 

WhatsApp Image 2018-10-09 at 12.31.25 PM (1).jpeg

मिळालेल्या माहितीनुसार आम्ही दोघेजण त्या दोन्ही अजगरांना रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी सापाला रेस्क्यू करत असताना १० फूटी अजगराला आम्ही रेस्क्यू केलं. या अजगर वनविभागाकडे दिले आहे. परंतू दुसरा अजगर हा १४ फूट लांबीचा आणि वजनदार असल्यामुळं त्याला रेस्क्यू करता आलं नाही.  
- मुर्लीधर जाधव, पोलिस कॉन्स्टेबल 


म्हणून वन्यजीव मानवी वस्तीत शिरतात

मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमुळे आणि मेट्रोच्या कामामुळे जमिनीला हादरे बसत आहेत. यामुळे अजगरांची घरं नष्ट होत असल्यानं हे वन्यजीव शहरी वस्तीत येत आहेत. मुंबईत मानवी वस्तीमध्ये वन्यजीवांचं शिरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून गेल्या ९ महिन्यात वांद्र्यातील कुर्ला संकुल परिसरात अनेक अजगर पकडल्याची माहिती सर्पमित्र अतूल कांबळे यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा