Advertisement

मुंबईकरांना मिळणार हवेच्या दर्जाचा अलर्ट, अत्याधुनिक प्रणाली विकसित

सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी ॲन्ड पॉलिसीतर्फे आयोजीत इंडिया एअर समीटमध्ये आयआयटीएमने या नव्या प्रमाणीची माहिती दिली.

मुंबईकरांना मिळणार हवेच्या दर्जाचा अलर्ट, अत्याधुनिक प्रणाली विकसित
SHARES

मुंबईकरांना आता हवेच्या दर्जाची आगाऊ माहिती दिली जाणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीने (आयआयटीएम) एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम (एक्यूईडब्यूएस) विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना हवेच्या प्रदुषणाची सद्यस्थिती (रिअल टाईम) आणि पुढील काळातील स्थितीची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी ॲन्ड पॉलिसीतर्फे आयोजीत इंडिया एअर समीटमध्ये आयआयटीएमने या नव्या प्रमाणीची माहिती दिली. 

आयआयटीएमची वेबसाईट https://ews.tropmet.res.in/mumbai/index.php वर मुंबई महानगर परिसरातील हवामानाची भुतकाळातील माहिती, सद्यस्थिती (रिअल टाईम डाटा), आणि मुंबई महानगरातील २४ ठिकाणांचा दुपारी २.०५ आणि रात्री १० वाजताचा हवामानाचा दर्जा याविषयी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मुंबई महानगर परिसरात हवेच्या दर्जाची नोंद करणारी नेव्ही नगर, मालाड पश्चिम, बोरिवली पूर्व, देवनार, पवई, मुलुंड पश्चिम, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, महापे, वसई, नेरुळ, कल्याणसह २० ठिकाणी केंद्रे आहेत.

आयआयटीएमने दिल्ली, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, कोलकता आणि मुंबई या शहरांत असलेल्या ४२० हवा दर्जा निरीक्षण केंद्रांशी संलग्न असलेल्या एअरोसोल ऑप्टिकल डेप्थवरुन हवेच्या दर्जाचा एकात्मिक डाटा मिळवला आहे.

वरिष्ठ संशोधक डॉ. प्रतिमा सिंग यांनी सांगितले, की ‘‘हवेच्या निरीक्षणासाठी आणखी सेन्सरची आवश्यकता आहे. काही गृहनिर्माण सोसायट्यांमधून स्वस्तातील सेन्सर बसवले जात आहेत. त्यांची हवामानाची माहिती देण्यात महत्वाची भूमिका राहील. या सेन्सरची अचूकता आणि विश्वासार्हता जास्त असल्याने नागरिक व्यक्तीगत पातळीवर प्रदुषण कमी करण्यासाठी सहकार्य करू शकतात. किंबहुना नागरिकांनी स्वत:हुन स्वत:च्या आरोग्यासाठी प्रदुषण कमी करण्यासाठी पाऊल उचलणे, हेच महत्वाचे ठरणार आहे.’’



हेही वाचा

गणेशोत्सवात १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला तीन दिवस परवानगी

1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरात वाढ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा