Advertisement

मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यातील तापमानात प्रचंड बदल पाहायला मिळत आहेत. कुठे उष्णतेची लाट तर कुठे पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा
SHARES

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. सांगसीलह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसासह  उष्णतेच्या लाटेचा इशारा हवान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

पुण्यात सलग तिस-या दिवशी वादळी वा-यासह पाऊस पडतोय. तर वाघोली परिसरात गारांचा मारा झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. तर दुसरीकडे राज्यभरात उष्णतेची लाट पसरलीये. हवामान खात्यानंही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर, पारा चाळीशीच्या पार पोहचला आहे.  तसंच मुंबईमध्येही प्रचंड उष्णता वाढली आहे. 

सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाली आहे. तर, काही भागात गारांचा पाऊस पडला आहे.  अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला आहे. अकोले तालुक्यातील राजूर परीसरात पावसाने हजेरी लावली आहे. 

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे  37°C आणि  27°C च्या आसपास असेल.

कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहाणार आहे.  प्रतितास 30-40  किमी वेगाने वारे वाहतील. तसेच  हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिकच्या मालेगावमध्ये तापामानात सतत वाढ पाहायला मिळत असून आहे. आग ओकणाऱ्या सूर्यनारायणामुळे मालेगावच्या तापमानाचा पारा 43.2 अंशावर पोहचलाला असून हे या वर्षीच्या हंगामातील सर्वांधिक तपामान नोंदले गेले.



हेही वाचा

सुशोभिकरणासाठी झाडांवर लावण्यात आलेले दिवे काढण्याचे पालिकेला आदेश

मुंबईत एप्रिल महिन्यात 10 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा