Advertisement

९ सप्टेंबरपासून 'अशी' असेल पावसाची स्थिती, IMD कडून महत्त्वाची माहिती

मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

९ सप्टेंबरपासून 'अशी' असेल पावसाची स्थिती, IMD कडून महत्त्वाची माहिती
SHARES

९ सप्टेंबर पासून राज्यात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामुळे बाप्पाच्या आगमनात कोणतीही अडचण नसेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) आणि उपनगरांसह मध्य महाराष्ट्र (Madhy Maharashtra), मराठवाडा (Marathwada), कोकण (Konkan), विदर्भात (Vidharbha) धुव्वाधार पाऊस होत आहे.

पुढच्या ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. गणपती आगमनाला काही दिवस बाकी असताना होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिक चिंतातूर झाले आहे. मात्र

८ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असून पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.

९ सष्टेंबर रोजी ठाणे, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर १० सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरीसाठी येल्लो अलर्ट आहे. ११ सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग साठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा