Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

प्रदूषणात महाराष्ट्राचा दुसरा नंबर, राज्य सरकार लागले कामाला

रस्त्यांवर होणाऱ्या कामामुळे आणि धुळीमुळे सर्वाधिक प्रदूष होत असल्याचं उघड झालं आहे.

प्रदूषणात महाराष्ट्राचा दुसरा नंबर, राज्य सरकार लागले कामाला
SHARES

सन २०१७ आणि २०१९ मध्ये वायू प्रदूषणामुळे एक लाख मृत्यूची नोंद झाली आहे. वायू प्रदूषणामुळे बळी गेलेल्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती योजनेत (NCAP), महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं (CPCB) हवामान प्रदूषणात २०-३० टक्क्यांची कपात करण्यासाठी एकूण १९ शहरे नावं दिली आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद यासारख्या काही शहरे सूचीबद्ध केली आहे. सर्वात नवीन जोडली जाणारी वसई-विरार महानगरपालिका आहे. वाहनं आणि औद्योगिक उत्सर्जन (औष्णिक विद्युत प्रकल्पांसह), बांधकामामुळे उडणारी धूळ आणि घन इंधन उत्सर्जन हे महाराष्ट्रात वायू प्रदूषणास कराणीभूत आहेत.

राज्यातील वायू प्रदूषणाची वाढती समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र पर्यावरण विभागातील तज्ञ, नागरी संस्था आणि अधिकारी यांनी मंगळवारी एकत्र येऊन राज्यभरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विस्तृत शिफारशी विकसित केल्या.

मंगळवार, २ मार्च रोजी झालेल्या या चर्चेमागील विचार हा होता की, हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य हवामान कृती योजनेत समावेशासाठी प्रभावी शिफारसी तयार करणं. टाऊन हॉलमध्ये सरकार, संशोधक, डॉक्टर, पर्यावरण गट, नागरिक संघटना, कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांच्या प्रमुख भागधारकांचा सहभाग होता.

महाराष्ट्र पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, महाराष्ट्र सरकारच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी शहरातील सभागृहात संबोधित केलं. “पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे आणि मंत्रालयातील सर्वजण हे जाणतात की २०२१-२०३० चा हा दशक बहुधा शेवटचा दशक आहे. म्हणूनच सरकारनं मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांपासून विदर्भातील खेड्यांपर्यंत माझी वसुंधरावर मोहीम राबवली.”

म्हैसकर पुढे म्हणाले, “या शिफारसी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमोर ५ जूनला (जागतिक पर्यावरण दिन) सादर करावयाच्या कागदपत्रात समाविष्ट केल्या जातील. राज्यातील हवामान कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्यातील धोरणकर्ते यापैकी अनेक शिफारसी शक्य तितक्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतील.”

पुलमोकेअर रिसर्च अण्ड एज्युकेशन (प्यूर) फाउंडेशन, पुणे, सुदीप साळवी यांनी वाढत्या वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल आपली चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की. “लेन्सेट प्लॅनेटरी हेल्थ बरोबर केलेल्या आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, सर्व वयोगटातील नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास झाला आहे. घरातील वायू प्रदूषण देखील यास कारणीभूत आहे.”Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा