Advertisement

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना दिलासा! UTS ॲपमध्ये केला 'हा' बदल

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठीच्या यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपमध्ये अनेक प्रवासी तिकीट बुक करतात.

Mumbai Local News : रेल्वे प्रवाशांना दिलासा! UTS ॲपमध्ये केला 'हा' बदल
SHARES

यूटीएसमध्ये ( UTS ) मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुक करण्यासाठीच्या अंतराच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मोबाईल ॲपद्वारे तिकीट बुकिंगसाठीच्या अंतराची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

उपनगरीय  ( Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा दोन किलोमीटरवरुन पाच किलोमीटर करण्यात आली आहे. तर गैर-उपनगरीय ( Non-Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा पाच किलोमीटर यांच्यावरुन 20 किलोमीटर करण्यात आली आहे. यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठीच्या यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपमध्ये अनेक प्रवासी तिकीट बुक करतात. रेल्वेच्या तिकीट घराच्या खिडकीवर लांबच लांब रांग लावण्यापेक्षा लोक ऑनलाईन तिकीट बुक करणं पसंत करतात. यासाठी यूटीएस ( UTS ) या मोबाईल ॲपचा वापर केला जातो.

मात्र, या ॲपलाही काही मर्यादा होत्या. त्यामुळे बहुतेक वेळा तिकीट बुक करताना प्रवाशांना अडथळे येत होते. दरम्यान आता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने युटीएस ॲपमधील अंतराचे निर्बंध शिथिल करत अंतराची मर्यादा वाढवली आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा