Advertisement

सर्वसामान्यांसाठी 'या' वेळेत सुरू होणार लोकल सेवा?

रेल्वे प्रवासाची वाट पाहणाऱ्या असंख्य सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाठी आणखी काहीकाळ कळ सोसावी लागणार आहे.

सर्वसामान्यांसाठी 'या' वेळेत सुरू होणार लोकल सेवा?
SHARES

रेल्वे प्रवासाची वाट पाहणाऱ्या असंख्य सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाठी आणखी काहीकाळ कळ सोसावी लागणार आहे. मुंबई लोकल ट्रेन मार्च महिन्यापासून आतापर्यंत सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. मात्र, चाकरमान्यांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन काही प्रमाणात दिलासा देण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. त्यानूसार, कमी गर्दीच्या वेळेस म्हणजेच सकाळी ७ च्या आधी आणि रात्री १० नंतर लोकल सेवा सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व महापालिका प्रशासन अत्यंत सावधपणं व हळुहळू पावलं टाकत आहे. त्यामुळं अद्याप पूर्ण क्षमतेनं सर्वांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. या संदर्भात सतत नवनव्या तारखा दिल्या जात आहे. सुरुवातील डिसेंबरच्या मध्यात लोकल सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, तो मुहूर्त टळला. त्यानंतर नव्या वर्षात कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेतला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता वेगळीच माहिती पुढं येत आहे.

मुंबई लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा विचार सुरू आहे. मात्र, ती पूर्ण वेळ नसेल, अशी माहिती पुढं येत आहे. त्याऐवजी कमीत कमी गर्दी असलेल्या वेळेत ट्रेन सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. सध्यस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारनं वेळोवेळी परवानगी दिलेल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. महिलांनाही प्रवासाची मुभा असला तरी त्यासाठी ठराविक वेळा देण्यात आल्या आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा