Advertisement

मुंबईकरांनो पावसाबाबत IMDची अपडेट जाणून घ्या

आज मुंबईत कसा असेल पाऊस याबाबत आयएमडीने अंदाज वर्तवला आहे

मुंबईकरांनो पावसाबाबत IMDची अपडेट जाणून घ्या
SHARES

भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज मुंबईसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट (मुसळधार ते अतिवृष्टीचा) आणि  आणि शुक्रवारसाठी ‘यलो अलर्ट’ इशारा (संभाव्य गंभीर हवामानाबद्दल अपडेट रहा) जारी केला आहे.

मंगळवारी रात्री 8.30 वाजेपर्यंत 24 तासांत, कुलाबा आणि सांताक्रूझ येथील IMD च्या वेधशाळांमध्ये अनुक्रमे 42mm आणि 20mm नोंद झाली. वांद्रे, अँटॉप हिल आणि दादर परिसरात पावसाचा जोर जास्त होता.

मुंबई, ठाण्यामध्ये काही ठिकाणी आज, बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे.

पूर्व-पश्चिम वाऱ्याची प्रणाली सिंधुदुर्गाजवळ असून, ती अधिक सक्रिय झाल्यास पावसाचा जोर वाढू शकतो.

सह्याद्रीला धडकून कोकणामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरीमध्येही तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा