पावसाळ्यापूर्वी होणार दहिसर नदीचा सर्व्हे

दहिसर - भाजपाच्या आमदार मनिषा चौधरी यांनी पालिकेच्या आर उत्तर विभाग, आर मध्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत दहिसर नदीच्या काठी असलेल्या झोपड्यांचे पुन्हा एकदा सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सर्व्हेमध्ये दोन्ही वॉर्डच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसह भाजपाचे कार्यकर्ते देखील सहभागी होतील. या वेळी मनिषा चौधरी म्हणाल्या की, दहिसर नदीच्या किनारी राहणाऱ्या नागरिकांना दहिसरमध्येच घरे दिली जातील. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्या नदीच्या किनारी सुरक्षा भिंत देखील बांधण्यात येईल. तसंच इथे राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतरित केलं जाणार आहे.

Loading Comments