Advertisement

१६ वर्षांच्या मुलाची कमाल, कॅमेरात कैद केले चंद्राचे फोटो

सोशल मीडियावर १६ वर्षाच्या पुणेकर प्रथमेश जाजू चंद्राची अतिशय सुंदर छायाचित्रं व्हायरल होत आहेत.

१६ वर्षांच्या मुलाची कमाल, कॅमेरात कैद केले चंद्राचे फोटो
SHARES

सोशल मीडियावर १६ वर्षांच्या पुणेकर प्रथमेश जाजू चंद्राची अतिशय सुंदर छायाचित्रं व्हायरल होत आहेत. प्रथमेशचे क्लिक केलेले चंद्राचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. प्रथमेशनं चंद्राचे ५५ हजारांहून अधिक फोटो क्लिक केले आहेत.

आश्चर्य म्हणजे त्यानं त्यासाठी १८६ गीगाबाईट डेटा वापरला. याबाबत प्रथमेश सांगतो की, त्याला अ‍ॅस्ट्रोफिझिक तज्ज्ञ व्हायचे आहे, पण सध्या अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी हा त्यांच्यासाठी छंद आहे.

प्रथमेशनं सांगितलं की, ‘मी ३ मे रोजी रात्री १ वाजता हे फोटो टिपले. मी सुमारे चार तास व्हिडिओ आणि फोटो काढले. यानंतर प्रोसेस करण्यास ३८-४० तास लागले. ५० हजार फोटोंमागील मुख्य कारण म्हणजे चंद्राचा सर्वात स्पष्ट फोटो होता. मी चंद्राचे बारीक तपशील पाहण्यासाठी सर्व फोटो एकत्रित केले आणि फोटोंना अजून शार्प बनवले.

रॉ डेटा जवळपास १०० एमबी होता आणि जेव्हा मी त्यावर प्रक्रिया केली, तेव्हा डेटाचा आकार १८६ जीबीपर्यंत वाढला. जेव्हा मी त्यांना एकत्र केलं, तेव्हा अंतिम डेटा सुमारे ६०० जीबीपर्यंत पोहोचल्याचं प्रथमेशनं स्पष्टीकरण देताना सांगितलं.

प्रथमेश म्हणतो, मी काही लेख वाचले आणि यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले. मी तिथे हे फोटो कॅप्चर करणं आणि त्यावर अभ्यास करणं याविषयी माहिती गोळा केली. एक खगोलशास्त्रज्ञ बनून मला खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. या क्षणी, अ‍ॅस्ट्रोफोटोग्राफी हा माझ्यासाठी फक्त एक छंद आहे.

त्याचबरोबर प्रथमेशनं सांगितलं की, हा फोटो एचडीआर कंपोजिट आहे, ज्यामध्ये थ्रीडी इफेक्ट देण्यासाठी दोन वेगवेगळे फोटो केले आहेत. तिसऱ्या तिमाहीतील चंद्राचा हा फोटो माझा सर्वात तपशीलवार आणि स्पष्ट फोटो आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा