Advertisement

... म्हणून मुंबई विद्यापीठातील ५००० झाडांना बसवला क्यूआर कोड

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील तब्बल पाच हजार झाडांना क्यूआर कोड बसवण्यात आला आहे.

... म्हणून मुंबई विद्यापीठातील ५००० झाडांना बसवला क्यूआर कोड
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील तब्बल पाच हजार झाडांना क्यूआर कोड बसवण्यात आला आहे. त्याद्वारे झाडाचे नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी वा इतर वापर याचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे.

विद्यापीठाच्या भूगोल आणि लाईफ सायन्स विभागानं पुढाकार घेऊन या झाडांची नोंद केली आहे. यासोबतच विद्यापीठाच्या आवारात आढळणारे पक्षी, कीटक यांच्याही नोंदी करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानं मुंबई विद्यापीठाच्या भूगोल, लाईफ सायन्स आणि एनएसएस पदव्युत्तर विभाग यांच्या समन्वयाने ‘जैवविविधता अहवाल’ तयार करण्यात आला आहे. या अहवालाअंतर्गत विद्यापीठातील १० सेंटीमीटरपेक्षा अधिक आकाराचे खोड असलेल्या ५,३५७ झाडांची नोंद (जिओ टॅगिंग) करून त्यांना क्यूआर कोड बसवण्यात आले. त्याद्वारे विद्यापीठात हे झाड नेमके कुठे आहे याची माहिती मिळते.

तसंच झाडाचे बोलीभाषेतील नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी आणि इतर उपयोग यांचे तपशील सहज उपलब्ध होतात.

शिवाय झाडांची कार्बन ग्रहण करण्याची क्षमताही टिपण्यात आल्या आहेत. हे पाहण्यासाठी ‘लीव्ह ग्रीन’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या कामात सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे आणि राजदेव सिंग यांचे विशेष सहकार्य लाभले.

राजेंद्र शिंदे हे वनस्पतीशास्त्रज्ञ (बोटॅनिस्ट) आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ (टॅक्सनॉमिस्ट) आहेत. झाडांना लावण्यात आलेल्या ‘क्यूआर कोड’च्या छपाईसाठी विद्यार्थी विकास विभाग आणि केएलइ महाविद्यालयानं अर्थसहाय्य केले.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा