Advertisement

२६ व २७ तारखेला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता


२६ व २७ तारखेला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

मुंबईत सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईच्या अनेक भागात सोमवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. परंतु मंगळवारी दिवसभर पावसानं विश्रांती घेतली. मागील २४ तासांत सांताक्रूझ वेधशाळेमध्ये ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच, कुलाबा वेधशाळेत ०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटच्या माहितीनुसार मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. परंतु, ढगाळ वातावरणामुळं हलक्या पावसाची शक्यता आहे.

पावसाच्या विश्रांतीमुळं तापमानात वाढ झाली आहे. उकड्यानं मुंबईकर हैराण झाले आहेत. उत्तर कोकण, गोवा आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नाही. स्कायमेटच्या अंदाजानुसार हलका पाऊस पडेल. जुलै महिन्याच्या सरसरीनुसार आणखी पावसाची गरज आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, मुंबईत २६ व २७ रोजी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, सध्यस्थितीत मुसळधार पावसाची शक्यता नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा