Advertisement

'एक पाऊल पर्यावरणाकडे'


'एक पाऊल पर्यावरणाकडे'
SHARES

सायन (कोळीवाडा) - 'एक पाऊल पर्यावरणाकडे' या उद्देशानं कोळीवाडातल्या कोकरी आगार परिसरात 12 नोव्हेंबरला विनामूल्य तुळशी रोपांचं वाटप केलं. तालुका काँग्रेस कमिटी वॉर्ड क्रमांक 166 च्या वतीने नगरसेविका ललिता कचरू यादव यांनी या कार्यक्रमात कोकरी आगारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, जय महाराष्ट्रनगर आणि साईबाबा मंदिर परिसरात एक हजार तुळशींच्या रोपांचं वाटप केलं. या वेळी मुंबई काँग्रेस एस. सी. सेलचे अध्यक्ष कचरू यादव, स्लमसेल तालुका अध्यक्ष रामनारायण अग्रहरी, युथ काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष मुरादअली मानकर, जिल्हा उपाध्यक्ष आदी देवेंद्र, इसाक मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा