SHARE

जोगेश्वरी - काही दिवसांपासून मुंबईत गारवा वाढला आहे. हवेत विषाणूंच्या संख्येत वाढ होत असल्याने सर्दी, खोकला, ताप यांसारखे साथीचे रोग बळावले आहेत.

बदलत्या वातावरणामुळे केईएम, ट्रामा केअर, नायर या रुग्णालयात साथीच्या आजारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या एरव्हीपेक्षा दुप्पट - तिप्पट झाली आहे. ट्रामा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार बाह्य रुग्णालयात साथीच्या आजाराचे 150-200 रुग्ण नेहमी येतात. पण आता ही संख्या दुपट्टीवर गेली आहे. यात ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आजार आढळून आल्यास टाळाटाळ न करता वेळीच तपास करून घ्या असा सल्ला के पूर्व पालिका आरोग्य विभागाचे अभियंता भुपेंद्र पाटील यांनी दिला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

निर्दयी
भीषण