Advertisement

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाजणार 'भोंगा'

'भोंगा' या आगामी चित्रपटाची सतराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाजणार 'भोंगा'
SHARES

सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत फार क्वचित बनतात. राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी आपल्या चित्रपटातून कायमच हा प्रयत्न करत वास्तवाची जाणीव करून दिली आहे. असाच वेगळा विषय असलेल्या त्यांच्या 'भोंगा' या आगामी चित्रपटाची सतराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाली आहे.


१० ते १७ जानेवारी दरम्यान महोत्सव

'पुणे फिल्म फाउंडेशन' आणि 'महाराष्ट्र शासन' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा सात मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यात 'भोंगा' या चित्रपटाचाही समावेश आहे. १० ते १७ जानेवारी दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 'भोंगा'ची झालेली निवड ही निश्चितच आनंददायी असल्याचं दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांगितलं.

या चित्रपटाचं दिग्दर्शन तसेच कथा-पटकथा शिवाजी लोटन पाटील यांची आहे. संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणीरंजन दास यांचं असून, संकलन निलेश गावंड यांचं आहे. चित्रपटाची गीतं सुबोध पवार यांनी लिहिली असून. संगीतकार विजय गटलेवार यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. कलादिग्दर्शन संतोष समुद्रे यांचं आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा