Advertisement

'मोलकरीण बाई'नं मारली सेंच्युरी

क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर संपला असला तरी छोट्या पडद्यावर मात्र कायम सेंच्युरीचा धडाका सुरूच असतो. 'मोलकरीण बाई' या मालिकेनं शंभर भागांचा टप्पा पार करत आपला दबदबा निर्माण केला आहे.

'मोलकरीण बाई'नं मारली सेंच्युरी
SHARES

क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर संपला असला तरी छोट्या पडद्यावर मात्र कायम सेंच्युरीचा धडाका सुरूच असतो. 'मोलकरीण बाई' या मालिकेनं शंभर भागांचा टप्पा पार करत आपला दबदबा निर्माण केला आहे.

'मोलकरीण बाई' या मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते १०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला. रिअल लोकेशनवर या मालिकेचं शूटिंग पार पडतं. त्यामुळं खऱ्याखुऱ्या वस्तीत हे सेलिब्रेशन पार पडलं. या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारीका निलाटकरनं याप्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ती म्हणाली की, मालिकेचे शंभर भाग कधी पूर्ण झाले कळलंच नाही. या मालिकेच्या निमित्तानं आमचं छान कुटुंब तयार झालं आहे. प्रत्येकालाच एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी माहिती आहेत. पडद्यामागची हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेने यशाचा असाच टप्पा पार करत रहावा अशी भावना सारिकानं व्यक्त केली.

'मोलकरीण बाई' मालिकेच्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यापुढील प्रवासही तितकाच रंजक आणि उत्कंठावर्धक असणार असल्याची खात्री मालिकेच्या टीमकडून व्यक्त केली जात आहे. नेहमीपेक्षा काहीसं वेगळं कथानक ही या मालिकेची खासियत असून, याच कारणामुळं प्रेक्षकांचीही 'मोलकरीण बाई'ला पसंती मिळत असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मालिकेत अनिताची बहिण रंजना अनिताच्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. अनिता यावर कशी मात करणार? याची कहाणी मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा