Advertisement

मुंबई पोलिसांना राष्ट्रपती पदक


मुंबई पोलिसांना राष्ट्रपती पदक
SHARES

मुंबई - यंंदा राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील 39 पोलिसांचा समावेश आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाला या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. यात 14 मुंबई पोलिसांचा समावेश आहे. पोलीस दलातील चमकदार कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून गौरवण्यात येते. त्यापैकी मुंबई पोलीस दलातील पोलिसांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

 

  1. शांतीलाल अर्जुन भामरे, पोलीस उपायुक्त (मंत्रालय सुरक्षा विभाग)
  2. यशवंत नामदेव व्हटकर, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, मुंबई
  3. संजय निकम, लाचलुचपत विभाग, मुंबई
  4. संजय गणपत सुर्वे, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा
  5. सुखलाल वर्पे, पोलीस निरीक्षक, मुंबई
  6. प्रकाश मनोहर नलावडे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, मुंबई (राज्य गुप्तचर विभाग)
  7. विजय राजाराम आंबेकर, पोलीस उपनिरीक्षक (चोरी आणि दरोडा विरोधी पथक, मुंबई)
  8. हणमंत तुळसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक (एसआरपीएफ - 3, मुंबई)
  9. राजेंद्र पांडुरंग कारंडे, पोलीस हवालदार, वर्सोवा पोलीस ठाणे
  10. अशोक हुंबे, पोलीस हवालदार, गुन्हे शाखा, मुंबई
  11. जयप्रकाश माने, गुप्तवार्ता विभाग, मुंबई
  12. चंद्रकांत शिंदे, पोलीस हवालदार, 'ल' विभाग, ताडदेव
  13. जयवंत संकपाल, पोलीस हवालदार, मुंबई गुन्हे शाखा
  14. राजीव विष्णू जाधव, पोलीस हवालदार, मुंबई गुन्हे शाखा
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा