दररोज महिला दिन हवा - अमृता फडणवीस

 Mumbai
दररोज महिला दिन हवा - अमृता फडणवीस

माटुंगा - महिला दिनानिमित्त स्मार्ट क्लासचा उद् घाटन सोहळा माटुंगा येथील श्रीमती मणिबेन एम.पी.शाह वुमन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या महाविद्यालयाच्या विसजनी रावजी सभागृहात झाला.

सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयातील आणि शैक्षणिक, कॉर्पोरेट क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी गायन, नृत्य तसंच डीप योगाचा प्रकार सादर केला. "महिला सक्षमीकरण म्हणजेच त्याची पहिली पायरी ही शिक्षण आहे. जर आपले शिक्षण व्यवस्थित असेल तर कुठल्याही प्रसंगावर मात करून आपण आपले विचार मुक्तपणे मांडू शकतो आणि फक्त या एकाच दिवशी नव्हे तर दररोज नारी शक्तीचा महिला दिवस साजरा केला गेला पाहिजे, असं अमृता फडणवीस या वेळेस म्हणाल्या.

Loading Comments