Advertisement

संविधान दिनानिमित्त बाईक रॅली


संविधान दिनानिमित्त बाईक रॅली
SHARES

मुंबई - केंद्र आणि राज्य सरकारने 26 नोव्हेंबरला संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा करावा असे निर्देश दिले आहेत. या संविधान दिनाचे औचित्य साधत संविधान गौरव बहुजन महामोर्चा कृती समिती मुंबईच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघात गुरुवारी पत्रकार परिषदेत संविधान गौरव बहुजन महामोर्चा कृती समितीच्या वतीने देण्यात आली. या कृती समितीच्या वतीने मुंबईत ठाणे आणि नवी मुंबईतून संविधान गौरव बाईक आणि मोटार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई पूर्व उपनगरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, चेंबूर येथून सकाळी 9 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. तर पश्चिम उपनगरातून दहिसर चेकनाका येथून रॅलीला सुरुवात होईल. या दोन्ही रॅली वांद्रे पूर्वेकडील कलानगर येथे एकत्र येणार आहे. दादरच्या चैत्यभूमीवर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन होऊन रॅलीचे समारोप करण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा