चाईल्ड व्हिजन फाऊंडेशनचा बालदिन

 Mumbai
चाईल्ड व्हिजन फाऊंडेशनचा बालदिन
चाईल्ड व्हिजन फाऊंडेशनचा बालदिन
See all

धारावी- चाईल्ड व्हिजन फाऊंडेशनच्या वतीने धारावी झोपडपट्टी येथील मुलांसोबत शुक्रवारी बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी चाईल्ड व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सूरज गेहलोत आणि महाव्यवस्थापक अभिनव कुमार उपस्थित होते.

झोपडपट्टीतील मुलांचे आयुष्य इतर मुलांच्या तुलनेत धकाधकीचे असते. त्यांच्या आयुष्यात दोन क्षण आनंदाचे यावे याकरिता चाईल्ड व्हिजन फाऊंडेशनने या मुलांसोबत बालदिन साजरा केला. नृत्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, प्रश्न मंजुषा सह अनेक मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेने केले होते. ५ ते १६ वयोगटातील सुमारे २०० मुलांनी यात सहभाग घेतला. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. परिस्थितीअभावी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या कला-कौशल्यांना वाव मिळत नाही. परिणामी काही मुले वाम मार्गाला लागतात. या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या वेळचा बालदिन या मुलांसोबत साजरा करण्यात आला, असे चाईल्ड व्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सूरज गेहलोत यांनी सांगितले.

Loading Comments