SHARE

दादर - महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचा 'महाराष्ट्र दीप पुरस्कार' वितरण सोहळा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथे रविवारी झाला. पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रशंसनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे यावेळी सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यात पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक, छायाचित्रण, दिवाळी अंक या क्षेत्रातील मिळून एकुण 30 पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर विशेष जीवन गौरव पुरस्कार (साहित्यकार) पंढरीनाथ तामोरे आणि मदन मारुती चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) यांना देण्यात आला. आपल्या कार्यात अगदी निर्भीडपणे आणि प्रशंसनीय अश्या कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान सोहळा हा गेली 17 वर्षे महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघातर्फे आयोजित केला जातो, असं या वेळी अध्यक्ष प्रकाश पाटकर यांनी सांगितले. या वेळी प्रमुख पाहुणे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, प्रा. हेमंत सामंत (संपादक - भक्ति संगम), प्रा. आशिष चव्हाण (संस्थापक - आधार पतसंस्था), मुक्त पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या