सातवा माय होम इंडिया पुरस्कार डॉ. बीरुबाला राभांना

 Lower Parel
 सातवा माय होम इंडिया पुरस्कार डॉ. बीरुबाला राभांना
 सातवा माय होम इंडिया पुरस्कार डॉ. बीरुबाला राभांना
 सातवा माय होम इंडिया पुरस्कार डॉ. बीरुबाला राभांना
See all

दादर - माय होम इंडिया हा पुरस्कार आसामच्या समाजसेविका डॉ. बीरुबाला राभा यांना ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधूताई सकपाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माय होम इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीनं 23 नोव्हेंबरला दादरच्या सावरकर सभागृहात हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. 1 लाख रुपयांचा धनादेश, शाल श्रीफळ आणि भारत मातेचे आसामच्या पोशाखातील चित्र असं या पुरस्काराचं स्वरुप होतं. यावेळी आसामच्या भाषेत बीरुबाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्याला माय होम इंडिया या सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी तसंच सिंधूताई सपकाळ, माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments