बाल आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीची धमाल


  • बाल आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीची धमाल
  • बाल आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीची धमाल
SHARE

प्रतीक्षानगर - येथील अशोक पिसाळ मैदानात बाल आनंद मेळावा भरवण्यात आला होता. 26 आणि 27 नोव्हेंबर या दोन दिवसांत सायंकाळी 7 ते 10 या वेळेत हा मेळावा सुरू राहिला. हा मेळावा शिवसेना शाखा क्रमांक 173 आणि सुवर्ण क्रीडा मंडळ यांनी आयोजित केला होता. मेळाव्यात बच्चे कंपनीसाठी मनोरंजक खेळ होते. लहान मुलांनी त्यांचा मनमुराद आनंद लुटला.

"लहान मुलांच्या मनोरंजनासाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हा मेळावा आयोजित केला गेला. मेळाव्याला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला," असं नगरसेविका प्रणिता वाघधरे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या