मुक्या प्राण्यांसाठी मदतीचं आवाहन

 Santacruz
मुक्या प्राण्यांसाठी मदतीचं आवाहन
मुक्या प्राण्यांसाठी मदतीचं आवाहन
See all

वांद्रे - माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही जगण्याचा हक्क आहे. त्यांचे जीवन अजून सुकर बनवण्यासाठी 1996 सालापासुन कार्यरत असलेल्या आय.डि.ए.(इन डिफेन्स ऑफ अॅनिमल्स)चा प्राण्यांसाठी फंड जमा करण्याचा कार्यक्रम मंगळवारी रात्री झाला.

मदत गोळा करण्यासाठी तौफिक कुरेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बँडचं सादरीकरण केलं. या वेळी आय.डि.ए.च्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी असलेली अभिनेत्री रवीना टंडन, हिंदी चित्रपट सृष्टीतले अभिनेते बोमन इराणी हे उपस्थित होते. प्रख्यात वादनकार तौफिक कुरेशी यांचे वादन ऐकण्यासाठी प्रत्येक प्रवेशासाठी 2000 रूपये आकारण्यात आले होते.

2 लाखांहून अधिक रक्कम या कार्यक्रमाद्वारे गोळा करण्यात आली. विविध ठिकाणी असेच कार्यक्रम करून आर्थिक निधी उभारला जाईल आणि ही रक्कम प्राण्यांना चांगले जीवन, त्यांचे औषधोपचार करण्यास खर्च केली जाणार असल्याचं आय.डि.ए.च्या अध्यक्षा फिझा शहा यांनी सांगितलं.

Loading Comments