Advertisement

१२ व्या शकतातील 'गीत गोविंद'चा पुन्हा घेता येणार अनुभव!


१२ व्या शकतातील 'गीत गोविंद'चा पुन्हा घेता येणार अनुभव!
SHARES

जयदेवांनी १२ व्या शतकात लिहलेल्या 'गीत गोविंद'ची मोहिनी आजही लोकांना मोहीत करत आहे. राधा आणि कृष्णाला जाणून घेण्यासाठी त्याच्या प्रेमामध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी नृत्यदर्पण ‘गीत गोविंद’ पुन्हा घेऊन येत आहे. पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या विद्यार्थिनी नृत्य दिग्दर्शिका संध्या दामले यांनी 'गीत गोविंद'चे नृत्य दिग्दर्शन केले आहे. संध्या दामले यांनी ‘गीत गोविंद’च्या माध्यमातून वेगळा विचार प्रेक्षकांसमोर मांडला आहे. येत्या ५ जानेवारीला प्रेक्षकांना याचा अनुभव घेता येणार आहे.

'गीत गोविंद'मधील कृष्ण साकारणे हा माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता. या अनुभवातून जाताना मला कृष्णाबद्दल अनेक नवनवीन गोष्टी समजल्या. पंडित जसराज यांच्या कम्पोझिशनमध्ये काम करणे, नृत्य करणे फार कठीण होते. गेल्या २० वर्षांत हा माझा पहिला क्लासिकल परफॉर्मन्स आहे.

श्रेयस देसाई, नृत्यकार

‘गीत गोविंद’च्या २ तासांच्या कार्यक्रमामध्ये १२ गाण्यांचा अास्वाद रसिकांना घेता येणार आहे. पंडित जसराज यांनी या गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. शंकर महादेव, अनुराधा पौडवाल, महालक्ष्मी अय्यर आणि श्रेया घोषाल यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात गाणी गायली आहेत. राधा व कृष्णाची संपूर्ण कथा नृत्यामधून ५ जानेवारी रोजी दादर येथील स्वतंत्र्यवीर सावरकर सभागृहात सायंकाळी ६.०० वाजता सादर होणार आहे. या वेळी श्रेयस देसाई, प्रियांका सकपाळ, अनुष्का साळवी, ईशा पेठे, नित्या रमेशकुमार, ज्ञानदा कडव, दिव्या रमेशकुमार हे आपल्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवतील.



जयदेवांच्या 'गीत गोविंद'मधून त्यांच्या अध्यात्मिक उंचीचा अनुभव येतो. कृष्णाच्या अल्लडपणामागे अध्यात्म आहे. कृष्णाच्या रासलीला, कृष्ण म्हणजेच परमात्मा, हे सगळं यामुळे शिकता आलं. २००५ मध्ये ही सीडी माझ्या आईने माझ्यासाठी विकत घेतली होती. जेव्हा जेव्हा यातली गाणी ऐकायचे, तेव्हा मनामध्ये चलबिचल व्हायची. यावर चांगला कार्यक्रम करता येईल, असं अनेकदा मनात आलं. जानेवारीपासून यावर काम करायचा निश्चय केला.

संध्या दामले, नृत्य दिग्दर्शिका


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा