काळा घोडा भागात होणार घोड्याचा पुतळा

 Kala Ghoda
काळा घोडा भागात होणार घोड्याचा पुतळा

काळा घोडा - फोर्टमधील जहांगीर आर्ट गॅलरी आणि डेव्हिड ससून लायब्ररीचा मध्यभाग काळा घोडा नावाने ओळखला जातो. या भागात आता नावाला शोभेल असा काळ्या घोड्याचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा 12 फुट उंच असेल. काळा घोडा असोसिएशननं यासाठी पुढाकार घेतला असून, पुतळ्याची नवी प्रतिकृती बसवण्यासाठीचा संपूर्ण खर्चही असोसिएशन उचलणार आहे. वास्तुविशारद अल्फाज मिलर यांनी हा पुतळा डिझाइन केला आहे. काळा घोडा भागातला घोड्याचा पुतळा 1965मध्ये जागेवरून हलवून भाऊ दाजी लाड संग्रहालयात नेऊन ठेवण्यात आला होता.

महापालिकेच्या हेरिटेज समितीनं नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली. आजवर केवळ वाहनतळ म्हणून वापरल्या जाणार्‍या या चौकात, आता काळ्या घोड्याचा हा पुतळा मुंबईकरांचं लक्ष वेधून घेईल. वाहतूक विभागानंही हा पुतळा उभारण्यास परवानगी दिली आहे. कला प्रदर्शन आणि कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात काळ्या घोड्यालाही आता हक्काची जागा मिळणार आहे.

Loading Comments