Advertisement

बालक मेळावा कार्यक्रमाचं आयोजन


बालक मेळावा कार्यक्रमाचं आयोजन
SHARES

वडाळा - तेजसनगर इथल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट रेनॉल्डस इन्स्टिट्यूटच्या वतीने सोमवारी बालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात जवळपास 100 मुलांनी सहभाग घेतला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यात सामान्य ज्ञान आणि प्रश्न मंजुषा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, चेंडू फेक, वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत विजयी झालेल्या मुलांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या वेळी इन्स्टिट्यूटचे उप कार्याध्यक्ष पी. सी. प्रजापती, सरचिटणीस ए. डी. शेळके, आर. एम. डोईफोडे, राजेश राठोड, अभय हरळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा