• शहिदांना श्रद्धांजली
SHARE

मुंबई - काश्मीरच्या उरीमध्ये झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांसाठी मुंबईच्या १८ रेल्वे स्थानकावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. चर्चगेट, सीएसटी, बांद्रा, दादर, कुर्ला, भांडुप, ठाणे, मरिन लाईन्स, विले पार्ले, परळ, बोरिवली, खार, वाशी, अंधेरी, सांताक्रुझ, घाटकोपर, मुंबई सेंट्रल या स्थानकांवर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी एआयएटीएफचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा, बीएसएफचे जवान सुधीर सिंग आणि जवान दिलीप मोहिते यांनीही श्रद्धांजली वाहिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या