रतन टाटा जायन्ट्स जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित


SHARE

दरवर्षीप्रमाणे यंदाही जायन्ट्स इंटरनॅशनलतर्फे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औद्योगिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करणारे रतन टाटा यांना जायन्ट्स जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जायन्ट्स इंटरनॅशनला 45 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका नामांकीत हॉटेलमध्ये रविवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला.
दरवर्षी उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व असलेले तसेच आपल्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून साद्गुरू जग्गी वासुदेव आणि भाजपा प्रवक्ता शायना एन. सी. उपस्थिती होत्या.

जायन्ट्स इंटरनॅशनलतर्फे दरवर्षी समाजातील नावाजलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा यांना देण्यात आला. यांच्या व्यतिरिक्त चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता राजपाल यादव, योगामध्ये डॉ. एच आर नागेंद्र, बॅरीअॅट्रिक सर्जनमध्ये डॉ. मुफ्फझल लाकडावला, पत्रकारितेत मालविका संघवी, व्यावसायिक इंडस्ट्रीत सायरस आणि अदार पुनावाला, सुमन तुलसीयानी, डॉ. महेश कापडिया आणि शिक्षण क्षेत्रात जयश्री पेरिवाल या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले.

जायन्ट्स इंटरनॅशनलची स्थापना 1972 मध्ये नाना छुदासमा यांनी केली. यामध्ये आतापर्यंत संपूर्ण देशात एकूण 600 समूह आहेत. ही संस्था सामाजिक कार्यात सक्रिय आहे. तसेच स्त्री भ्रूण हत्या, स्वच्छ भारत अभियान आणि योगासारख्या इतर गोष्टींवर काम करते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या