Advertisement

पुस्तके जीवनाचा आलेख बदलू शकतात- न्या. संदीप शिंदे


पुस्तके जीवनाचा आलेख बदलू शकतात- न्या. संदीप शिंदे
SHARES

आयुष्यात पुस्तकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण ज्या वर्गात शिकतो, त्याच वर्गाची पुस्तके वाचावीत, अशी कोणतीही अट नाही. चार पुस्तके आपल्या जीवनाचा आलेख बदलू शकतात, असं वक्तव्य मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी केलं. 'दसपटी मराठा सेवा मंडळ मुंबई' यांच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.


IMG_20171105_181100.jpg


'पुस्तकांसारखा गुरू नाही'

यावेळी न्या. संदीप शिंदे म्हणाले, या पदापर्यंत पोहोचताना जेवढं कुटुंब महत्त्वाचं होतं तितकीच पुस्तकेदेखील महत्त्वाची ठरली. अवांतर वाचन ज्ञानात भर घालण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पुस्तकांसारखा दुसरा कोणताही गुरू नाही. 

हा सोहळा दादरच्या शिवाजी मंदिर येथील राजर्षी शाहू सभागृहात झाला. कार्यक्रमात ५०हून अधिक गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनंत शिंदे, सरचिटणीस नरेश शिंदे, अरुण शिंदे, मुख्य सेक्रेटरी दौलतराव शिंदे, उपाध्यक्ष दादुराव शिंदे, रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे यांच्यासह कोकणातल्या १३ गावांमधील नागरिक, विद्यार्थी, कला, क्रीडा क्षेत्रातील अनेक मंडळी उपस्थित होती.


'आ. सुनील शिंदे दसपटीचे पुत्र'

'दसपटी सेवा मंडळा'च्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वरळीचे शिवसेना आमदार आणि दसपटीचे पुत्र सुनील शिंदे म्हणाले, दसपटीची थाप पाठीवर पडल्यावर उत्साह प्राप्त होतो. मी आमदार असलो तरी माझे आई वडील अशिक्षित होते. तरीही त्यांनी दसपटीच्या सर्व कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. मी मंडळाशी कायमच संलग्न होतो. आई-वडिलांनी समाजासाठी असलेले नियम काटेकोर पाळल्याचा फायदाच होत आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा