Advertisement

अभिजीत म्हणतोय, मला बाहेर काढा

अडगळीच्या खोलीमधून अचानक अभिजीतचा आवाज 'मला बाहेर काढा' हा आवाज आल्यावर सगळ्यांनाच भीती वाटली. शिव, विणा, वैशाली आणि इतर सदस्य धावत बाहेर आले. अभिजीत मला बाहेर काढा इतकच म्हणत होता.

अभिजीत म्हणतोय, मला बाहेर काढा
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरातील स्टोर रूममधून अभिजीत केळकर अचानकच गायब झाला. घरातील सदस्यांना तो नक्की कुठे गेला आहे हे समजत नव्हतं. काही सदस्यांना वाटलं कि हा टास्कचा भाग असावा आणि या घटनेनंतर घरामध्ये मर्डर मिस्ट्री हा टास्क सुरू झाला होता. आज अडगळीच्या खोलीमधून अचानक अभिजीतचा आवाज 'मला बाहेर काढा' हा आवाज आल्यावर सगळ्यांनाच भीती वाटली. शिव, विणा, वैशाली आणि इतर सदस्य धावत बाहेर आले. अभिजीत मला बाहेर काढा इतकच म्हणत होता. त्यामुळं शिव आणि विणाबरोबर इतर सदस्यांची घाबरगुंडी उडाली. 

रुपालीकडं वैशाली आणि शिवनं वारंवार चावी मागितली, पण त्यावर रुपालीनं काहीच उत्तर दिलं नाही. शिव म्हणाला की, त्याला बाहेर काढायचं आहे, हा टास्कचा भाग नाही आहे. तरीही रुपालीनं काहीच उत्तर न दिल्यानं शिवचा पारा चढला आणि तो म्हणाला की, इतकं पण कॅप्टन बनली आहेस म्हणून वागू नको आणि विसरू नकोस आम्ही मदत केली आहे तुला. शिवला रुपाली म्हणत होती की, ओरडू नकोस, ऐकलं मी. त्यावर शिव म्हणाला की, तू कामच तशी करतेस, तुला इतकीशी पण कदर नाही आहे, ओरडू नको म्हणतेस लाज वाटत असेल तर उघड ना पटकन दार. रुपालीचा आवाज चढला आणि ती म्हणाली की, मला दोन मिनिट द्या.

बिग बॉसच्या घरात एकीकडं हा गोंधळ सुरू आहे तर दुसरीकडं हीना आणि नेहा शिवानी येण्याआधी खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या होत्या, पण अचानक शिवानीच्या येण्यानं हे नातं बदललं आहे. हीनानं नेहाला नॉमिनेट करणं, हीना आणि नेहामध्ये भांडण होणं या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. शिवानीनं अचानक बाथरूममध्ये जाऊन हीनाच्या अंगावर पाणी ओतलं. असंच शिवानीनं परागच्या बाबतीतही केलं होतं. त्यामुळंच हीनानं देखील तिला हेच म्हटलं की, जे परागबरोबर केलंस तेच केलंस माझ्यासोबत.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा