कोल्ड प्लेच्या आयोजकांना दंड

 Pali Hill
कोल्ड प्लेच्या आयोजकांना दंड

मुंबई - सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कोल्ड प्ले बाबत कॉन्सर्ट संपल्यानंतरही वाद काही पिच्छा सोडण्याचं नाव घेत नाहीये. वेळेची मर्यादा न पाळल्याबद्दल मुंबई पोलिसांनी कोल्ड प्ले च्या आयोजकांना दंड ठोठावला आहे. मुंबईमध्ये ध्वनिक्षेपकांना 10 वाजताची मर्यादा घालून दिली, मात्र कोल्ड प्ले चा कार्यक्रम हा साडे दहा नंतरही सुरु असल्याने मुंबई पोलिसांना आयोजकांवर कारवाई करणं भाग पडलं. कोल्ड प्ले काॅन्सर्टच्या आयोजकांना मुंबई पोलिसांनी तब्बल साडे बारा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रात्री दहा वाजेपर्यत गाणी वाजवण्याच्या परवानगी नंतरही रात्री साडे दहा वाजेपर्यत मोठ्या आवाजात कार्यक्रम सुरू होता. अखेर बीकेसी पोलिसांनी कारवाई करत आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करून दंड वसूल केल्याचे पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी सांगितले.

Loading Comments