ज्ञानसंपदा वाचनालयाचं उद् घाटन

 Mahim Railway Station
ज्ञानसंपदा वाचनालयाचं उद् घाटन
ज्ञानसंपदा वाचनालयाचं उद् घाटन
ज्ञानसंपदा वाचनालयाचं उद् घाटन
ज्ञानसंपदा वाचनालयाचं उद् घाटन
ज्ञानसंपदा वाचनालयाचं उद् घाटन
See all

माहीम - वाघिणी प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू केलेल्या ज्ञानसंपदा वाचनालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या दिमाखात झाला. या सोहळ्याला मनसे नेते नितीन सरदेसाई, गटनेते आणि नवनियुक्त विभाग अध्यक्ष संदीप देशपांडे, नगरसेवक वीरेंद्र तांडेल, शाखाध्यक्ष शशांक नागवेकर. मच्छीमार कृती समितीच्या उज्ज्वला पाटील, काँग्रेसचे महादेव खैरमोडे आदी उपस्थित होते. राजन पारकर यांच्या वतीनं शुक्रवारपासून माहीम विभागात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उघडण्यात आलं. विभागातल्या लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी मी हा छोटासा प्रयत्न केलाय. सर्वच प्रकारची पुस्तकं या वाचनालयात ठेवण्यात आली आहेत, असं शाखाध्यक्ष राजन पारकर यांनी म्हटलंय.

Loading Comments